Published On : Wed, Jul 31st, 2019

राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थ सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण

Advertisement

संदीप कांबळे कामठी

कामठी : -राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थ सहाय्य योजने अंतर्गत महिला लाभार्थ्यांना तहसील कार्यालय सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते प्रत्येकी 20 हजार रुपयाचे धनादेश वितरण करण्यात आले यानुसार एकूण तीन लक्ष साठ हजार रुपयाचे धनादेश वितरण करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यां ऍड सुलेखाताई कुंभारे,एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, मुख्याधिकारी रमाकांत डाके , संजय गांधी निराधार योजनेचे कामठी तालुकाध्यक्ष अनिल निधान, नायब तहसिलदार आर डी ऊके प्रामुख्याने उपस्थित होते.

घरच्या कर्ता व्यक्तीचे अकस्मात निधन झाल्यास त्या कुटुंबातील गरीब विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थ सहाय्य योजने अंतर्गत 20 हजार रुपयाचे सानुग्रह मदत दिली जाते यानुसार माहे जुलै महिन्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयाचे धनादेश देयक करण्यात आले.

या लाभार्थ्यांत रुखमा गंगाधर भाकरे(चिखली), रत्ना रुस्तम गजभिये(भुगाव), पुनाबाई पंढरी खेडकर, पुष्पाताई मारोतराव वैद्य (भुगाव), आशा नामदेव दाते(शिवणी), सुवर्णा भीमराव रामटेके(महादुला), मंगला सहादेव जांगडे(सुरादेवी), दुर्गा नरेंद्र भोयर(येरखेडा), अनिता मनोहर तडस(कामठी), सरिता अजय वासनिक(राणी तलाव कामठी), संगीता रतनकुमार बोरकर(जयभीम चौक), पुष्पलता अमोल मेश्राम(हरदास नगर), रानु दिनेश चवरे(रमाई नगर), आसिमा बानो(नया बाजार), पूजा भारत सहारे(रमानगर), रेखा देवभान नगरकर(केसोरी), माया गुणवन्त उसारे (मोंढा कामठी)यांचा समावेश आहे.