Published On : Wed, Jul 31st, 2019

नैसर्गिक आपत्तीअंतर्गत 4 लक्ष रुपयाचा धनादेश वितरण

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुमथळा येथे शेतावर दोन मित्र कामाला जात असताना पावसात अकस्मात वीज कडाडून अंगावर पडल्याने एका मित्राचा जागीच मृत्यू तर एक जख्मि झाल्याची दुर्दुवी घटना 29 जून ला सायंकाळी 6 दसरम्यान घडली होती.

यातील मृतक चे नाव चैतन्य रवींद्र पातोळे वय 17 वर्षे रा गुमथळा कामठी तर जख्मि चे नाव मुकेश बाहेकर असे होते यातील मृतक चैतन्य पातोळे यांचे वडील रवींद्र पातोळे यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 4 लक्ष रुपयाचा धनादेश पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते वितरीत करण्यात आला.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार गणेश जगदाडे, अमोल पौड, शेख , श्रुती सुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी