Published On : Fri, Oct 9th, 2020

पुरामुळे बाधित नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

Advertisement

भंडारा : पुरामुळे बाधित झालेल्या नुकसान ग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे. अनुदान जमा केल्याचे प्रमाणपत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचे हस्ते वितरीत करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात हे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून सानुगृह अनुदानाची रक्कम यापुर्वीच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती आशा पगाडे, हिवराज कोसरे गणेशपूर, जगदीश पिल्लेवान, भुमेश पिल्लेवान ईटगाव पवनी, पुरूषोत्तम शेंडे, जयवंताबाई मेश्राम मुंढरी बुज मोहाडी, रतिराम दिघोरे, दुधराम दिघोरे चप्राड लाखांदूर यांना घरांच्या नुकसानीसाठी 95 हजाराची सानुग्रह अनुदान देण्यात आले.

नवयुवक मत्सव्यवसाय शेतीसाठी निविष्ठा मदत म्हणून 56 हजार 600 रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. मत्सव्यवसाय संबंधित नौकासाठी बबन भोला मेश्राम, शैलेश भुरे, देवाजी मेश्राम, प्रभाकर मेश्राम, कुंदन मेश्राम, रमेश मेश्राम व भिकारू मेश्राम यांना प्रत्येकी 9 हजार 600 रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांनी केले.