Published On : Tue, Aug 20th, 2019

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सायकल वाटप

नागपूर : नागपूर महानगर पालिकेच्या सायकल बँक योजने अंतर्गत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२०) विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात सायकल वितरण करण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने यावेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी केले आहे.