Published On : Tue, Aug 20th, 2019

बास्केटबॉल सांघिक भावनेची शिकवण देणारा खेळ : महापौर नंदा जिचकार

‘महापौर चषक’ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात

नागपूर : कोणत्याही खेळामध्ये जय-पराजय हे असतेच. मात्र या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करुन त्याच्या चांगल्या बाजूंचा आपल्या जीवनात अंगीकार करणे ही बाब एक खेळाडू म्हणून महत्त्वाची आहे. खेळ व्यक्तीला निर्णायकपणा, स्वतःसोबत इतरांना सहकार्य करण्याचे शिकवते.बास्केटबॉल या खेळात खेळाडूंच्या चपळपणासह सांघिक भावनाही महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडूला सांघिक भावनेची शिकवण देणारा बास्केटबॉल हा खेळ आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुले व मुलींच्या ‘महापौर चषक’ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेचे सोमवारी (ता.१९) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. बजाज नगर येथील नुतन भारत युवक संघाच्या बास्केटबॉल कोर्टवर आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी चंद्रमुखी शर्मा, मनपा सत्तापक्ष नेते व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनचे माजी सचिव मुकुंद धस, आयोजन समितीचे सचिव भावेश कुचनवार, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे संयोजक वीरेंद्र रानडे, आयोजन समिती सदस्य व्यंकटेश कपले, शत्रुघ्न गोखले, प्रणय घाटे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिका शहरातील नागरिकांना भौतिक सुविधा पुरविण्यासह खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठीही कटिबध्द आहे. महिलांच्या कुस्ती स्पर्धेसह ‘महापौर चषक’च्या अनेक स्पर्धा आयोजित करून नागपूर महानगरपालिकेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रृंखलेत आता मनपातील सत्तापक्ष नेते व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या पुढाकाराने आयोजित ‘महापौर चषक’ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेची भर पडली आहे. खेळ आणि खेळाडूंसाठी मनपा सदैव कटिबध्द आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

प्रास्ताविकात मनपातील सत्तापक्ष नेते व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने शहरात सुरू झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाने शहरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले आहे. यासोबतच त्यांनी खेळाडूंच्या सुविधेसाठी शहरातील ६६ मैदानांच्या विकासाचे कार्य सुरू केले आहे. याच प्रेरणेतुन नागपुरात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून शहरातील क्रीडा वातावरणाला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. क्रीडा संघटनांनीही आपसातील मतभेद विसरून खेळ आणि खेळाडूंसाठी एकत्र येऊन कार्य करावे, असे आवाहनहीत्यांनी यावेळी केले.

बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी चंद्रमुखी शर्मा म्हणाले, मोठ्या स्पर्धांच्या आयोजनातूनच खेळाडूंचा विकास होतो. बास्केटबॉल खेळाच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी सरसावलेल्या आयोजकांचे त्यांनी आभार मानले व अभिनंदन केले. याशिवाय खेळाडूंना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचे कौतुक
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराने थैमान घातले. सलग नऊ ते दहा दिवस पुराचा सामना करणा-या दोन्ही जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याचे सत्तापक्ष नेते व नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. महापौर नंदा जिचकार यांनीही या खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

प्रारंभी आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे व चमुने योग प्रात्यक्षिक सादर केली. तर नारायणा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमात माजी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व मागील ५० वर्ष बास्केटबॉलला योगदान देणा-या मान्यवरांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आर.जे. निकेता यांनी केले.

मुले व मुलींच्या सबज्यूनिअर (१३ वर्षाखालील) व ज्यूनिअर (१८ वर्षाखालील) या दोन गटामध्ये ही स्पर्धा असून स्पर्धेमध्ये सुमारे दोन हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. सिव्हील लाईन्स येथील आमदार निवास येथे सर्व खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था मनपा व एनडीबीएच्या वतीने नि:शुल्क करण्यात आली आहे. मुले व मुलींच्या सबज्यूनिअर आणि ज्यूनिअर गटामध्ये सुमारे २५० सामने खेळविण्यात येणार आहेत. सर्व सामने नुतन भारत युवक संघ (एनबीवायएस) बजाज नगर कोर्टसह नागपूर ॲमेच्यूर स्पोर्ट्स असोसिएशन