Published On : Tue, Aug 20th, 2019

नवर्‍याच्या व पत्नी च्या वादात साळीच्या एका महिन्याच्या मुुलाची निर्घृण हत्या

Advertisement

पाराशिवनी पासुन २० कि मी लांब पेच नदीच्या काठावरील बख।री गावच्या खुशाल वारकर यांची मुलगी रूपाली जितेंद्र पांडे हिचा छोटय़ाश्या एका महिन्याच्या मुलास तिचे मोठे भाऊजी हयानी धारदार शस्त्र किवा वस्तुने मारून आतडया बाहेर काढल्याने उपचारार्थ दाखल करण्या पर्यंत मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सोमवार (दि.१९) ला पाराशिवनी पासुन २०कि मी लांब बखारी (पिपळा) गावातील रहिवासी खुशालजी वारकर यांची लहान मुलगी बाळतंपणा पासुन माहेरी घरी होती. परंतु आज तिचे मोठे भाऊजी गणेश बोरकर ( कुही)ने बखारी ला घरी आले व मोठय़ा बहिणी सोबत भाडण सुरू असल्याने शिविगाळ करित घराबाहेर पळाल्याने घरात पाहिले तर छोटय़ाश्या मुलाच्या रडण्याचा आवाज एेकुन आत हेले असताना छोटय़ाश्या मुलाच्या पोटाच्या आतडया बाहेर दिसल्याने आरडाओरड करून तुरंत कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता परिस्थिती चिंताजनक असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केन्दाचे डॉः योगेश चोधरी यांनी मेयो दवाखाना नागपुर ला रवाना करण्यात आले परंतु मेयो मध्ये उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्या बाळास मुत घेषित केले.

Advertisement
Advertisement

पारशिवनी स्टेशन चे थानेदार विलास काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक नयन आलुरे व पी एस आय उबाळे हयानी पोहचुन घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी रूपाली जितेंद्र पांडे हिच्या फिर्यादी वरून अपराध क्रमाक २९५/१९दर्ज करून धारा ३०२ भा द वी चे तहद तिचे मोठे भाऊजी गणेश बोरकर राहनार कुही यांना सहा तासात ताब्यात घेऊन तपास करीत असुन पुढील तपास सुरू आहे.

मोठय़ा बहिणी चे व भाऊजी चे भांडण सुरू असल्याने त्यांनी आज येऊन आपला राग मा़झ्या मुलावर काढुन धारदार शस्त्र किवा वसतुु ने मारून माझ्या छोटय़ाशा मुलाची हत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले..

कमल यादव

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement