Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दारू पार्टीत वाद विकोपाला; मित्रानेच मित्राच्या पोटात खुपसला चाकू!

Advertisement

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथील संजय नगर परिसरात दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण झाले. अधिक दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या आणखी एका तरुणावरही चाकूने वार करण्यात आला. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नगर परिसरातील एका घरात दारू पार्टी सुरू होती. यावेळी 23 वर्षीय समीर उर्फ गणेश मसराम हा मित्रांसोबत मद्यपान करत होता. दरम्यान, अधिक दारू पाजण्याच्या कारणावरून समीर आणि 29 वर्षीय राहुल लाडेकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की राहुलने चाकू काढून समीरच्या पोटावर वार केला. यात समीर गंभीर जखमी झाला.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेत समीरला वाचवण्यासाठी धावून आलेला त्याचा मित्र शुभम कनोजिया यालाही आरोपीने चाकूने भोसकून जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. राहुल लाडेकर, प्रशिक भोवते आणि संदेश उर्फ मोन्या मासूरकर यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी प्रशिक भोवते आणि संदेश उर्फ मोन्या मासूरकर यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी राहुल लाडेकर अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

विशेष म्हणजे, पांढराबोडीतील संजय नगर परिसर यापूर्वीही खून, चाकूहल्ले आणि गँगवारसारख्या गुन्ह्यांमुळे चर्चेत राहिला आहे. या ताज्या घटनेमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.