Published On : Thu, Aug 29th, 2019

उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

रामटेक : उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नुकतेच महाआरोग्य शिबीर संपन्न झाले.वैद्यकीय व दंत शिबिराचे उदघाटन माजी आमदार व खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल माजी आमदार यांचे हस्ते पार पडले.

यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे,नगरसेवक संजय बिसमोगरे, प्रभाकर खेडकर, आलोक मानकर नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे ,रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .देवेंद्र पातूरकर व आभार प्रदर्शन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे यांनी केले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी 1361 रुग्णांणी लाभ घेतला. यात जनरल सर्जन डॉ नाईक, अरुनकुमार नाडंगे,बालरोग तज्ञ डॉ अविनाश मिसार, डॉ अली ,डॉ शमीम अख्तर,डॉ मेश्राम, नाक कान घसा तज्ञ डॉ घोडेवार, दंतरोगतज्ञ डॉ तुमाने,स्त्री रोग तज्ञ डॉ स्मिता गजभिये,डॉ कंगाली,डॉ शिवानी चेनिया,डॉ स्वाती गेडाम, डॉ गवते,डॉ संगीता क्षीरसागर, डॉ हेमंत वरके,डॉ सारिका गाजुलवार,डॉ दिव्या गुरबानी यांनी रुगणाची मोफत तपासणी केली.या शिबिरामध्ये आयुष प्रदर्शन,हिवताप प्रतिबंधक प्रदर्शन,मानवलोक प्रदर्शन लावण्यात आले होते.या प्रदर्शनाचा फायदा असंख्य रुग्ण व लोकांनी घेतला.

रक्त,थुंकी चाचणी,क्ष-किरण सोनोग्राफी, नेत्र तपासणी करण्यात आली.डॉ दिव्या गुरबानी यांनी 35 गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी केली. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोफत अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.शिबिराच्या दुसऱ्या दिवशी हैड्रोसिल व हर्नियाच्या 40 शस्त्रक्रिया पार पडल्या.सतत चार दिवस सुरु असलेल्या शिबिरात 2164 रुग्णांणी लाभ घेतला व 46 शस्त्रक्रिया पार पडल्या.सर्व रुग्णांना मोफत औषध व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.शिबिराचे यशस्वी आयोजन बद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे यांचे रुग्णांनी आभार व्यक्त केले.