Published On : Wed, Aug 19th, 2020

दिलीप दोडके मुख्य अभियंतापदी रुजू

नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या नागपूर परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंतापदी दिलीप दोडके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी स्वीकारली.

मूळचे नागपूरकर असलेले दोडके नागपूर शहर मंडल कार्यालयात मुख्य अभियंता पदी रुजू होण्यापूर्वी नागपूर शहर मंडल कार्यलयात अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत होते. तत्पूर्वी २०१९ पर्यंत मुंबई मुख्यालयात बिलिंग विभागात कार्यरत होते. नागपूरच्या व्हीएनआईटी मधून विदुयत अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतल्यावर दोडके हे तत्कालीन मराविम मध्य चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे कनिष्ट अभियंता पदी रुजू झाले होते.

त्यांनी कोराडी येथे ४०० के. व्ही. येथे सुमारे अडीच वर्षे काम केले. भांडुप नागरी परिमंडलात कार्यकारी अभियंता (प्रशासन) म्हणून त्यानी साडेपाच वर्ष काम केले आहे. अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी अकोला मंडल कार्यालयात काम केले आहे. मार्च-२०२० पासून ते प्रभारी मुख्य अभियंता म्हणून काम बघत होते.