Published On : Tue, Sep 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील दिघोरीत अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपुरातील दिघोरीत अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : नागपुरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी परिसरातील ‘टेक्सास स्मोकिंग शॉपी’ येथे विशेष पथकाने मध्यरात्रीनंतर छापा टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत रोकड आणि हुक्क्याच्या साहित्यांसह एकूण ९४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड रोडवरील दिघोरी येथील संबंधित शॉपीमध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री सुमारे अडीच वाजता विशेष पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारवाईदरम्यान शॉपीचा व्यवस्थापक ओंकार संदीप मडावी हा ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का उपलब्ध करून देताना आढळून आला. पोलिसांनी परवान्याबाबत विचारणा केली असता कोणतीही वैध परवानगी सादर करण्यात आली नाही. चौकशीत शॉपीचा मालक अविनाश पर्वतलाल पांडे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी शॉपीची झडती घेतली असता ३८ हजार १०० रुपयांची रोकड, विविध आकारांचे हुक्का पात्र, नळ्या, विविध स्वादांचे तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ९४ हजार २४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

या प्रकरणी शॉपीचा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमांनुसार वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध हुक्का व्यवसायाचा कालावधी किती होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक आणि वाठोडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.