Published On : Sat, Aug 31st, 2019

कन्हान-पिपरी ला बैलांचा पोळा सण थाटात साजरा.

कन्हान : – पिपरी व कन्हान ला बळी राज्यांचा जिवलग सोबती बैलांचा श्रृंगार आकर्षणमय करून पोळा सण हर्षो उल्हासात शांततेने थाटात साजरा करण्यात आला. बळीराजाच्या सोबत शेतीमधे वर्ष भर राबराब राबणाऱ्या बैला विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा चा सोबती बैलांचा पोळा हा जिव्हाळ्या चा सण मोठ्या उत्साहाने मुळ गाव पिपरी प्रभाग क्रं ३ सुदर्शन चौक येथे साजरा करण्यात आला.

पिपरी येथील युवा समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, गौरव भोयर, कमल पवार, कुंदन रामगुंडे, प्रदिप नाटकर, कुणाल आगुटलेवार, विक्रांत खडसे, किष्णा गावडे, आकाश भगत, बंटी ढोले, अभिषेक आकरे व पिपरी गावातील नवयुवकानी वंशपरंपरेनुसार श्री.सुभाष मोतीराम तिवाडे यांच्या राहत्या घरून वाजागाजासह मिरवणुक काढुन तोरणा तील बैलाचा विधिवत सर्जाराजाची पुजा अर्चना करण्यात आली. ” पचमुखी गौरा पारबती, हर बोला हर हर महादेव ” च्या गर्जनासह तोरण तोडुन पोळा फोडण्यात आला. याप्रसंगी नगर परिषद कन्हान चे पाणी पुरवठा सभापती मनोज कुरडकर, पोलीस पाटील शालीकजी ठाकरे, सुमेध खोब्रागडे, देवा चतुर आदीच्या उपस्थित अत्यंत हर्षोउल्हासात शांततेने पोळा सण थाटात साजरा करण्यात आला.

यावेळी गावकरी राधेशाम भोयर, रमेश ठाकरे, हरी उईके, गौरव भोयर, श्रीराम कोरवते, रामदास खडसे, केशरीचंदजी खंगारे, आकाश महातो, धनराजजी भोयर, दयाराम वाघाडे, रोशन खंगारे, हरीश ठाकरे, सचिन खंगारे, नरेश बावणे, संजय ठाकरे, राजु कुर्वे, मोरेश्वर भोयर, फजित खंगारे, उज्वल येलमुले, कृणाल आगुटलेवार, संदीप शेंडे, विक्रम तिवाडे, आशीष कुरडकर, राजा फुलझले ,करण वानखेडे, विक्की वाडीभस्मे, खुशाल डांगे, दिनेश ठाकरे आदी पिपरी व कन्हान येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थीत होते.

कन्हान ला बैलांचा पोळा सण साजरा
शुक्रवार ला कन्हान येथे सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या पोळ्या निमित्त नगरसेवक मा.राजेशजी यादव यांच्या घरून परंपरेनुसार गुढी काढुन पटांगणा त बैलांची पुजा अर्चना करून पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमोद बांते, रविभाऊ रंग, आकीब सिद्दीकी, पंकज गजभिये, प्रमोद वानखेडे, अविनाश रायपुरे, संजय चहांदे, गुड्डूभाऊ ठाकूर, सागर फुले, जगदीश यादव, राजीक सिद्दीकी, ज्ञानप्रकाश यादव, विजय यादव सह मोठ्या संख्येने नागरिक, शहरवाशी प्रामुख्याने उपस्थित होते.