Published On : Wed, Dec 17th, 2025
By Nagpur Today Nagpur News

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

कोकाटे प्रकरणानंतर घडामोडींना वेग
Advertisement

मुंबई : खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील काही सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटे यांना दोषी ठरवले असून, या निर्णयानंतर नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही धोक्यात आली आहेत.

अटकेचे वॉरंट जाहीर होताच माणिकराव कोकाटे हे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून या याचिकेवर येत्या शुक्रवारी (19 डिसेंबर) सुनावणी होणार आहे.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी एनडीएतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात असतानाच मुंडे यांचा दिल्ली दौरा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वीही माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना दिसल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली होती. त्या काळातही धनंजय मुंडे सक्रिय झाले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा कोकाटे अडचणीत सापडले असताना मुंडे थेट दिल्ली गाठल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

कोकाटे यांची जागा कोण घेणार?
दुसरीकडे, माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांचे मंत्रिपद कोणत्याही क्षणी जाऊ शकते, अशी चर्चा आहे. महायुती सरकारमध्ये जर कोकाटे यांची मंत्रिपदावरून गच्छंती झाली, तर त्यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार, यावरही राजकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement