Published On : Fri, May 5th, 2023

दीक्षाभूमी ते लेह-लदाकदरम्यान धम्म पदयात्रा आजपासून

- भारतातील १०० तर थायलंडचे १०० भन्ते होणार सहभागी
Advertisement

नागपूर: जगभरात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या सिद्धांताचा संदेश पोहोचवण्यासाठी बौद्ध धर्माचे अनुयायी कार्य करीत आहेत. जगातील धर्मसुधारक आणि विचारवंतांमध्ये सामील असलेले महात्मा बुद्ध हे बौद्ध धर्माचे प्रचारक होते. भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला ज्ञान, विवेक आणि सत्याचा मार्ग दाखवला. यापार्श्वभूमीवर दीक्षाभूमी ते लेह-लडाखदरम्यान धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती थायलंडचे मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुधी व गगन मलिक यांनी रवी भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.

वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचे औचित्य साधून गगन मलिक फाउंडेशन आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह-लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे.

वर्धा मार्गावरील उवैला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी 3 वाजता श्रामणेर बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ ते ८ मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामणेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास १०० श्रामणेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला आणि धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील १०० तर थायलंडचे १०० भन्ते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा १५ जुलै रोजी लेह-लडाख येथे पोहोचणार आहे.
दरम्यान श्रामणेर यांचा प्रवास हा बसद्वारे होईल, तर धर्मशाला से लेह- लडाखदरम्यान एक महिन्याची धम्म पदयात्रा राहील.