Published On : Tue, Nov 12th, 2019

रामटेक गढमंदीरावर मध्यरात्री भक्तांनी अनुभवला त्रिपूरी पोर्णिमेचा अपुर्व सोहळा

Advertisement

रामटेक : पुरातन काळापासून सुरू असलेला रामटेक येथील गडमंदीरावरील त्रिपूरी पोर्णिमेचा अपुर्व सोहळा भक्तगणांनी अनुभवला. शरद पोर्णिमा म्हणजेच कोजागिरीपासून सुरू झालेल्या उत्सवाचे समापन त्रिपूर जाळून करण्यात येते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदर्भातील विभिन्न भागातील तसेच छत्तीसगढ व मध्यप्रदेश येथील भक्तमंडळी सोबतच रामटेक व ग्रामीण परिसरातील हजारो मंडळी हा सोहळा बघण्यासाठी गडावर आली होती.

वर्षभर्‍याचे प्रभू श्रीराम व लक्ष्मणस्वामीचे वस्र तुपात भिजवून मंदीराच्य उंच कळसावर मुख्य पुजारी मुकुंदराव पंडेच्या हस्ते त्रिपूर प्रज्वलित होताच जय श्रीरामाच्या गजराने गढमंदीर परिसरदुमदुमून गेला.यावेळी संपूर्ण आध्यात्मिक सोहळ्यात राम पंडे, अविनाश पंडे, मोहन पंडे, धनंजय पंडे, संजय पंडे ,अक्षय पंडे सहभागी झाले होते.प्रसाद वितरण करण्यात आले तसेच भाविकांनी अत्यंत श्रद्धेने प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन तसेच परिसरातील मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले.रामनगरी ही उत्सवनगरी म्हणून प्रचलित असून या परिसरात काहीना काही उत्सव अनवरत सुरू असतात.

जणू रामटेक परिसर म्हणजे उत्सवाचे महासागरचं. …कारण सर्वात पावन व आनंदमयी सह चैतन्य फुलविणारं वातावरण या कार्तिक महिण्यांत असल्यामुळे शहरातील आबालवृद्ध या परिसरात फिरियला व व्यायाम योग करायला येतात. योग व आध्यात्माचा संगम या काकडआरती निमित्य येत असल्याने भाविकांमध्ये एक वेगळेचं चैतन्यमयी वातावरण असते.याच प्रमाणे पारंपरिक पद्धतीने त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला.

भव्य रोषणाईने सजलेला गडमंदिर परिसर ,सततची भाविकांची गर्दी यामुळे आणि जय श्रीराम च्या गजरामुळे परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.त्रिपुरी पौर्णिमेचा हा अभूतपूर्व सोहळा बघण्याकरीता हजारो रामभक्त एकत्रित झाले होते.

त्रिपुर च्या वेळी माजी खाद्य निगम सदस्य विजय हटवार, हितेंद्र चोपकर,राजाराम देशमुख,नगरसेवक अलोक मानकर,डॉ. नितीन वेरुळकर,पिंटू शर्मा, प्रशांत किम्मतकर, गिरीश राहाटे, राहुल कोठेकर,पुरुषोत्तम मेश्राम, चेतन चोपकर, भूषण नानोटे, अजय बोभाटे,विद्युत वितरण अधिकारी कुमरे मॅडम आदी रामभक्त, मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.