Advertisement
नागपूर : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूर मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
भाजपचे नेते आणि बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी ठिकठिकाणी हे बॅनर लावले आहे.
2019 ला जनतेने देवेंद्र फडणवीस यांना बहुमताने निवडून दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेने युतीत निवडणूक लढली होती. जनतेला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचेच नव्हते. देवेंद्र फडणवीस आजही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, अशी प्रतिक्रिया बबलू गौतम यांनी दिली.