Published On : Mon, Feb 24th, 2020

श्रमिक कल्याण विभागाचे विकास शिबीर संपन्न

Advertisement

कन्हान :- दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व कल्याण बोर्ड नागपुर आणि संकल्प ग्रामोत्थान बहु. संस्था टेकाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.शाला जुनी कामठी येथे असंगठित श्रमिकाचे दोन दिवसीय श्रम कल्याण व विकास कार्यक्रमाचे शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ.मीना कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व कल्याण बोर्डाचे शिक्षा अधिकारी श्री चन्द्रशेखर वैद्य, वैशाली संस्था चे दामोधर रामटेके आदी प्रामु ख्याने उपस्थित होते. सौ. मीना कावळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात महिलांना स्वयंसाहायता बचत गटच्या माध्यमातुन मिळणा-या विविध योजना आणि इतर शासकीय योजनाचा लाभ घेऊनआर्थिक रूपाने समक्ष बनण्याचे आवाहन करण्या तआले.

श्री चन्द्रशेखर वैद्य यांनी असंग ठित क्षेत्राच्या श्रमिकांनी सरकार द्वारे राबविण्या-या विविध योजनानी माहिती व श्रमिकांच्या उन्नती नियमाचे मार्गदर्शन केले. श्री रामटेके यांनी रोजगार व स्वयं रोजगारा करिता प्रशिक्षण तसेच वित्तीय सहायता प्रदान करणा-या महामंडळाची व वित्तीय संस्था विषयी मार्गदर्शन केले. संकल्प संस्थाचे सचिव अरविंद कुमार यांनी पंचायत राज व्दारे महिलांच्या सक्ष मीकरणा करिता असलेल्या योजनाची माहीती दिली. शिबीरात ४० श्रमिक महि लांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.ज्योती नवले यांनी तर आभार प्रदर्शन प्रणीता कावळे हयानी केले.