| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 11th, 2020

  स्मार्ट सिटी क्षेत्रात उद्योग, रुग्णालय, बाजारपेठ विकसित करा

  स्मार्ट सिटीचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांचा पारडी क्षेत्रात दौरा

  नागपूर : केन्द्र शासनाच्या गृहनिर्माण शहरी विकास मंत्रालयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन चे डायरेक्टर श्री. कुणाल कुमार यांनी गुरुवारी (१० डिसेंबर) ला भरतवाडा, पुनापुर, पारडी, भांडेवाडी क्षेत्राचा दौरा करुन नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड च्या वतीने केले जाणारे विकास कामांची पाहणी केली. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. उपस्थित होते.

  नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशनच्या वतीने पूर्व नागपूर मधील मागासलेल्या भागात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास केल्या जात आहे. या भागामध्ये ५१ किमी लांबीचे सीमेंट रोड, पाण्याची टाकी आणि विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गृह निर्माणचे काम हाती घेतले आहे. श्री. कुणाल कुमार यांनी विकास कामांच्या सोबत येथील जागेचा व्यवसायिक उपयोग करण्यासाठी उद्योग, रुग्णालय, महाविद्यालय, बाजारपेठ विकसित करण्याचे आवाहन केले.

  श्रीमती भुवनेश्वरी एस. यांनी त्यांना कळमना- पावनगाव रस्ता आणि भरतवाडा भागात केल्या जाणारे सीमेंट रोडच्या कामाबद्दल माहिती दिली. त्यांनी पाण्याची टाकी आणि होम स्वीट होम गृह निर्माण प्रकल्पाचा साईटवर जाऊन विकास कामाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांना तिथल्या प्रभावित नागरिकांचे पुर्नवसन आणि भूसंपादन विषयी सांगितले.

  त्यानंतर श्री. कुणाल कुमार यांनी श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर मध्ये सीसीटीवीच्या माध्यमाने केले जाणारे कामाबददल माहिती घेतली. नागपूर सेफ ॲन्ड स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूरात ३६०० कॅमेरे लावण्यात आले आहे. या लाईव्ह कॅमे-याचे माध्यमाने वाहतुकीचे नियम तोडणा-यांवर पोलिस विभागाकडून केली जाणारी माहिती दिली. मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी. यांनी नागपूर सिटी लाईव्ह ॲप च्या माध्यमाने नागरिकांची तक्रार सोडविण्याची पद्धतीबद्दल ही सांगितले. त्यांनी विविध दहा झोन मध्ये कार्यरत सफाई कामगारांचे ट्रेकिंगबददल ही माहिती दिली. श्री. कुणाल कुमार यांनी माहिती व तंत्रज्ञानाचा पुरेपुर उपयोग करुन नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मनपाच्या सर्व ॲप्सचे मॉनिटरिंग सी.ओ.सी.मधुन करण्याचे सांगितले. नंतर त्यांनी विविध कामांचा स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेऊन पर्यावरण विभागाचे नवीन उपक्रम अंतर्गत इंडिया सायकल फार चेंज चॅलेंज, सीताबर्डी बाजारपेठ “ओपन स्ट्रीट व्हेहीकल फ्री झोन” बायोडायवर्सिटी मॅप, शहराचा भूजलाची पातळीचे अध्ययन करणे आणि बिल्डींग इफीसिएंसी असीलरेटर बद्दल माहिती घेतली.

  यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे, कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकुर, महाव्यवस्थापक (मोबिलीटी/इन्फ्रास्ट्रक्चर) राजेश दुफारे,ई-गर्व्हनन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, चीफ प्लानर श्री. राहुल पांडे, पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, विधी अधिकारी श्रीमती मनजीत नेवारे, पुनर्वसन अधिकारी श्रीमती गुड्डी उजवणे, श्री मनिष सोनी, जनसंपर्क अधिकारी, श्री अमित शिरपुरकर, श्रीमती अमृता देशकर, श्रीमती सोनाली गेडाम, श्री श्रीकांत अहीरकर, श्री मोईन हसन, श्री कुणाल गजभिये, श्री अनूप लाहोटी, श्रीमती आरती चौधरी, श्री परिमल इनामदार आणि ICLEI संस्थे शार्दुल वेणगुरकर इत्यादी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145