Published On : Tue, Jul 23rd, 2019

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी संयुक्त रुपाने कार्य करण्याचा निश्चय

Advertisement

स्मार्ट सिटीचे दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

नागपुर: शहर विकासाचे नियोजन करणारे व धोरण आखणा-यांनी कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी संयुक्त रूपाने कार्य करणा-याचा निश्चय दोन दिवसीय कार्यशाळेत मंगळवारी केला. ए.एफ.डी युरोपियन युनियन यांच्या मोबीलाईज युवर सिटी उपक्रमाच्या अंतर्गत नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड, नागपूर महानगरपालिका, यू.एम.टि.सी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन होटेल तुली इंपेरीअल, रामदास पेठ, नागपूर येथे करण्यात आले होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यशाळेत विविध शासकीय यंत्रणाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेत आपले मत मांडतांणी यू.एम.टि.सी चे तज्ञ अजय कुमार, शहरी परिवहन व्यवस्थेत होणारे परिवर्तन बद्दल विस्तृत चर्चा केली व त्यांनी सांगीतले की धोरण आखणा-यांनी परिवहन सेवेचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे.

यू.एम.टि.सी चे दुसरे तज्ञ डॉ. अभिजीत लोकरे यांनी सायकल आणि पायी चालणारे नागरिकांवर चर्चा करताना यांना प्रोत्साहन देणारे धोरण तयार करण्याचे आवाहन केले. सुश्री सोनल शहा यांनी महिलांना बस वाहतूकी मध्ये या प्रवास करताना येणा-या अडचणीवर चर्चा उपस्थित केली व महिलांना शासनाने केंद्र बिंदु ठेवून धोरण निश्चित करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री प्रविण कुमार यांनी केंन्द्र शासनाच्या ईलेक्ट्रीक वाहनाना प्रोत्साहान देणा-या योजनेबद्दल माहिती विशद केली. श्री. जयराम रामक्रिष्णन व श्री. मुर्तुजा मोहमद्दी यांनी ईलेक्ट्रीक वाहनासाठी अक्षय ऊर्जा स्रोत वापर करण्यावर भर दिला. कार्यशाळेत डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, NSSCDCL श्री. महेश गुप्ता सयुक्त महाप्रबंधक, महामेट्रो, श्री. रजनीश अहूजा प्रकल्प व्यवस्थापक, ए.एफ. डी. श्री. विनोद जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. महेश मोरोणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, NSSCDCL, Nagpur, श्री. विजय बनगींनवार, श्री. राजेश दुफारे उपस्थित होते. श्रीमती जयश्री जिंदल राष्ट्रीय समन्वयक, MYC व निवेश मोदी, नागपूर शहर समन्वयक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement