Published On : Wed, Mar 18th, 2020

आसीनगर झोनचे उपअभियंता पझारे निलंबित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोन क्र. ९ मध्ये कार्यरत कर आकारणी विभागातील उपअभियंता अजय पझारे यांच्यावर मंगळवारी (ता, १८) शिस्तभंगाची कारवाई करीत नागपूर महानगरपालिका सेवेतून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त निर्भय जैन यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत. पदीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्रमांक १० नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करीत नियम ४ च्या पोटनियम (एक) अन्वये निलंबित करण्यात आले आहे.

सदर आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत उपअभियंता अजय पझारे यांचे मुख्यालय आसीनगर झोन असेल. कार्यकारी अभियंता यांच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. हा आदेश अंमलात असेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची खासगी अथवा निमसरकारी नोकरी अथवा कुठल्याही प्रकारचा खासगी व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.