Published On : Sat, Jul 6th, 2019

हद्दपार आरोपीस अटक करण्यात यशप्राप्त

कामठी: नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दुचाकी चोरीचे विविध गुन्हे दाखल असलेले एका सराईत गुन्हेगारास डिसीपी हर्ष पोद्दार यांनी मार्च महिन्यात नागपूर शहर पोलीस आयुक्तलयातून पुढील सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते

तरीसुद्धा सदर हद्दपार आरोपी घोरपड येथील राहत्या निवास स्थानपरिसरात दडी मारून बसला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांच्या मार्गदर्शनार्थ हिट स्कॉड च्या पथकाने वेळीच धाड घालून घोरपड पाण्याच्या टाकीसमोर या हद्दपार आरोपीस अटक करण्याची यशस्वी कारवाही सायंकाळी 6 वाजता करण्यात आली असून अटक आरोपीचे नाव सुरज सुभाष नागदेवें वय 21 वर्षे रा घोरपड कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही डिसीपी हर्ष पोद्दार व एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ पी आय संतोष बकाल, हिट स्कॉड चे ज्ञानचंद दुबे, प्रमोद वाघ, मंगेश गिरी, वेदप्रकाश यादव आदींनी केली .

संदीप कांबळे कामठी