Published On : Fri, Sep 29th, 2017

डेंग्यूने घेतला एका बालिकेचा बाली,

वाडी(अंबाझरी): वाडी परिसरात गत आठ महिन्यापासून डेंग्यू व स्वाईन फ्लू आजाराने थैमान घातले असून आज शनिवार दि 29 ला सकाळी उपचारा दरम्यान एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली,मृतक बालिकेचे नाव आरुषी हेमराज गायकवाड असे असून ती येथील एका खाजगी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होती,प्राप्त माहितीनुसार हेमराज गायकवाड हे हिंगणा तालुक्यातील नेरी मानकर येथील रहिवासी असून मुलीच्या शिक्षणासाठी दत्तवाडीतील इंद्रायणी नगर येथे बापूराव राऊतकर यांचे कडे किरायाने राहत होत.

मागील सहा दिवसापूर्वी आरुषीची प्रकृती ठीक नसल्यामुळे येथीलच आशा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते,डॉ शैलेश चालखोर यांनी सांगितले की तपासणीअंती तिला डेंग्यूची लक्षणे आढळून आल्यामुळे रुग्णाला नागपूर येथे उपचाराकरिता घेऊन जाण्यास रुग्णाचे वडिलांना सूचित केले होते,तीन दिवसांपूर्वी तिला नागपूर येथील कलर्स चिल्ड्रेन हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले होते,आज शनिवार सकाळी तिची प्राणज्योत मावळली,या दुःखद घटनेमुळे गायकवाड या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला,इंद्रायणी नगर येथील राहत्या घरी भेट दिली असता तेथे शोकाकुल वातावरण दिसून आले,गायकवाड हे नेरी मानकर येथील रहिवासी असल्यामुळे अंतिम संस्कार गावीच करण्याकरिता मृतक बालिकेचे मृत शरीर गावी घेऊन गेल्याचे घर मालकांनी सांगितले.

वाडीत डेंग्यू व स्वाईन फ्लू या आजाराने बळी झालेला हा दुसरा रुग्ण आहे,या पूर्वी नवनीत नगर येथील एका नागरिकाचा स्वाईन फ्लू ने बळी घेतला होता,वाडीत शासकीय रुग्णालय नसणे, व्यहाळ आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव,साधन सुविधांची कमतरता,अशा अनेक कारणांमुळे वाडीतील डेंग्यू,स्वाईन फ्लू,सारख्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना कडे दुर्लक्ष होत आहे,वाडीत अनेक रुग्ण आढळून येत येत असूनही यावर उपाय योजना पाहिजे तशी कार्यान्वित होत नसल्याची चर्चा परिसरात होत आहे,