Published On : Fri, Feb 21st, 2020

बाजार स्थलांतरित करतांना पैशाच्या झालेल्या गैरवापर प्रकारावर जीलाधिकारी कडून चौकशीची मागणी

कन्हान : नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे तालुक्यातील सर्वात मोठे आठवळी बाजारपेठ दर शुक्रवारी भरत असून या बाजारात जवळच्या ३० गावातील नागरिक बाजारासाठी येतात. हा बाजार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर भरत असून या महामार्गाला वेग आला आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनेतून माजी नागराध्यक्षाच्या कार्यकालात या बाजारासाठी अशोक नगर येथील काही जागा लाखो रुपये खर्चून किरायाने घेत बाजारपेठ स्थलांतरित करण्यात आले होते ज्याच्या विरोध त्या वेळेस नगरसेविका करुणा आष्टनकर यांनी केले होते.

महिन्याभर भरलेल्या बाजार पावसामुळे व सोयी अभावी पुनस्थ महामार्गावरील जागेवर आला आहे ज्या मुडे शासकीय रुपयांची फिजुल खर्ची करण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहे तर आठवळी बाजारात ५०० वर दुकाने लागत असून दुकानदारांकडून अवैध हप्ता वसुली करणारे चिट्टी कापणारे ठेकेदार व त्यांचे गुरघे करतात. ज्याची जाणीव नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे तरी सुद्धा हा भोंगळ कारभार जोमात सुरू आहे असून साठगाठ असल्याचे नाकारता येत नाही.

महामार्ग ४४ वर बाजार भरीत असतांना दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी व नागरिकांची कोंडी होते मात्र ट्राफिक पोलीस महामार्गावर उपस्थित दिसत नाही या उलट ये-जा करणाऱ्या विध्यार्थ्याना पोलीस स्टेशन समोर त्रास देण्याची भूमिका त्यांची असते. महामार्गावर अपघात झाल्यास त्याची जवाबदारी पोलीस प्रशासन, नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रशासन, चिट्टी ठेकेदार घेतील का व यावर नवनियुक्त नगराध्यक्ष या अति ज्वलंत प्रश्नावर गांभीर्य पूर्वक विचार करतील का ? व अस न झाल्यास जिल्हाधिकारी प्रशासकीय यंत्रणेवर कारवाई करतील का असा सवाल कन्हानचे नागरिक करीत आहे.