Published On : Fri, Feb 21st, 2020

हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमले श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर

कामठी : कन्हान आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर 334 वर्षापूर्वीचे वसलेले जुनी कामठी चे श्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिर आज 21फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त श्रद्धाळू भक्तभाविकांच्या हर हर महादेवाच्या जयघोषाने चांगलेच दुमदुमले.

महाशिवरात्री पर्वानिमित्त जुनी कामठी स्थित मानवता चे प्रतीक व अति प्राचीन कामनापूर्णश्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिरात कामठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह इतर ठिकानातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती पहाटे 4 वाजता भगवान श्री कामठेशवर महादेव यांचा प्रकाश सीरिया, ,लालू यादव, जयराम पारवाणी, लाला खंडेलवाल, चंदू लांजेवार, दीपक सीरिया, यांच्या शुभ हस्ते अभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने छावणी परिषद उपाध्यक्ष दीपक सीरिया, अजय कदम,दिनेश स्वामी, सदस्य चंद्रशेखर लांजेवार, लालू यादव, ,सुनील फ्रान्सिस,विजय लांजेवार,बाबूलाल हिरणवार, महादेव मामीलवार, अशोक अग्रवाल, श्रीराम कुशवाहा,अनिल गंडलिया, , युगचंद छललानी, भूषण इंगोले, उत्तम सायरे, सोनू पिल्ले, विजय लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसाठी विविध मार्गावर विविध सामाजिक, धार्मिक संघटना तसेच मंदिर कमिटी च्या वतीने ठिकठिकाणी भव्य महाप्रसाद तसेच शरबत वितरण करण्यात आले होते..भाविकांच्या सुरक्षात्मक दृष्टिकोनातून कन्हान पोलीस स्टेशन चे उपविभागीय अधिकारी पूजलवार व जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, दुय्यम पोलीस निरीक्षक परदेसी यांच्या नेतृत्वात पोलीसांचा ठिकठिकाणी विशेष चोख बंदोबस्त लावलेला असून दुर्घटनेला आळा बसावा यासाठी नदीकाठी तसेच मंदिर परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते..