Published On : Sat, Aug 17th, 2019

स्वातंत्र दिवसी महापुरूषाना अभिवादन करून बुंदीचे वितरण

कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे आयोजन.

कन्हान : – शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे १५ आॅगस्ट २०१९ ला ७३ व्या स्वातंत्र दिवसी पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक महामार्गावर माजी नगराध्यक्षा व नगरसेविका अँड आशाताई पनिकर यांच्या हस्ते भारत माता, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभ भाई पटेल, लालबहादुर शास्त्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषा च्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून वीर जवानांना व महापुरुषाना अभिवादन करून स्वातंत्र दिन उत्सव सोहळ्याची सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी थानेदार चंद्रकांत काळे, सभापती गेंदलाल काठोके, नगरसेविका अनिता पाटील, मनिषा पारधी, अमोल साकोरे, विनय यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋृषभ बावनकर यांनी तर चंदन मेश्राम यांनी आभार व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे, माधव वैद्य, आलोक सरोदे, हर्ष पाटील, संदीप कभे, नितिन मेश्राम, मुकेश गंगराज, सुरेश देवांनघण, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह नागरिकांनी सहकार्य केले.