Published On : Sat, Aug 17th, 2019

७३ व्या स्वातंत्र दिनी वृक्ष वितरण करून स्वातंत्र दिवस थाटात साजरा

कन्हान : – १५ ऑगस्ट भारतीय ७३ व्या स्वातंत्र दिनी रमाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था व बहुजन समाज पार्टी कन्हान शहर व्दारे वृक्ष वितरण करून स्वातंत्र दिवस सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

रमाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था व बहुजन समाज पार्टी कन्हान शहर अध्यक्ष श्री संदीप शेंडे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरां च्या हस्ते माल्यार्पण करून शालेय विद्यार्थी व नागरिकांना वृक्ष आणि बुंदीचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश फुलझले, रामटेक विधानसभा अध्यक्ष अश्वमेघ पाटिल, रामटेक विधानसभा प्रभारी दिनेश रंगारी, रायभान डोंगरे, शेखर चहादे, देवा गजभिए, अनिल मेश्राम, गौतम बागडे, बाबूलाल प्रसाद, महेश धोगडे, अभिजीत चांदूरकर, सिद्धार्थ पानतावने, चेतन वाघमारे, प्रमोद सहारे, चंद्रशेखर शेंडे, सुशील कळमकर,अंकित पानतावने, प्रमोद राऊत, सागर गजभिए, संघपाल सेंडे, लक्ष्मीकांत राऊत, शरद मेश्राम, नरेश सोनेकर, चरण मोटघरे, पंकज एटे, उमेश बागडे आदीने उपस्थित राहुन स्वातंत्र दिवस उत्सव साजरा केला.