नागपूर – नागपुरात गुन्हेगारांची दहशत वाढत असल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आले. तीन अज्ञात आरोपींनी त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून पलायन केले. विशेष म्हणजे, याच टोळीने काही मिनिटांतच अजनी परिसरात आणखी एक गंभीर गुन्हा केल्याची चर्चा असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय राम खाडे हा तरुण मागील काही महिन्यांपासून ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करतो. घटनेच्या रात्री तो मेडिकल चौक परिसरात ऑर्डर पोहोचवल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जात असताना राजा बक्षा हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचा रस्ता अडवला. आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यापैकी एका आरोपीने चाकू दाखवून धमकावले, तर इतरांनी त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. लुटलेल्या ऐवजाची किंमत सुमारे १७ हजार ९०० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
घटना घडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक गुन्हा घडल्याची माहिती समोर आली आहे. जोगीनगर परिसरातील एका नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन चाकूचा धाक दाखवून हिसकावण्यात आली. दोन्ही घटनांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथकेही कामाला लागली आहेत.
Nagpur: 17 वर्षीय क्रिकेटर की मौत, VCA चयन नहीं होने का जिक्र...
आरक्षण सुधार की मांग को लेकर रैली #NagpurNews #ReservationPolicy #Protest #Rally #MaharashtraNews
Nagpur Central Jail Murder Case: दोषी को उम्रकैद #NagpurNews #CentralJail #Crime #Murder...
राष्ट्र सुरक्षा के समर्थन में मौन पदयात्रा #MaharashtraNews #NationalUnity #Constitution #Youth
Abhijit Dipke का BJP पर बड़ा आरोप | #MaharashtraNews #AbhijitDipke #BJP #AmitShah...
Amravati में सड़क हादसों पर बड़ा एक्शन #AmravatiNews #RoadSafety #TrafficRules #Helmet #FakeHelmet





