मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पुन्हा एकदा अंतर्गत राजकारणामुळे चर्चेत आली आहे. पक्षातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे वेगळ्या गटासाठी पत्र सादर करणार असल्याच्या दाव्यांमुळे ठाकरे गटात हालचालींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच खासदारांची बैठक घेतली होती. मात्र, बैठकीला पाच खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना अधिक खतपाणी मिळाले. त्यानंतर काही खासदार वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी फुटीच्या शक्यतेचा इन्कार केला आहे. शिवसेनेचा संसदीय गट एकसंध असून तो अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खासदार फुटणार असल्याच्या अफवा गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र, उद्धव ठाकरे यांचा सर्व खासदारांशी सातत्याने संपर्क आहे,” असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी सांगितले की, रविवारी आणि सोमवारीही अनेक खासदारांशी संवाद झाला आहे. काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना त्यांनी, “असे कोणते पत्र असेल तर ते समोर आल्यानंतर त्यावर बोलू,” अशी सावध भूमिका घेतली.
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदारांच्या कथित नाराजीपासून ते संभाव्य फुटीच्या चर्चांपर्यंत सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर नवे आव्हान उभे राहणार का, याकडे आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
Nagpur: 17 वर्षीय क्रिकेटर की मौत, VCA चयन नहीं होने का जिक्र...
आरक्षण सुधार की मांग को लेकर रैली #NagpurNews #ReservationPolicy #Protest #Rally #MaharashtraNews
Nagpur Central Jail Murder Case: दोषी को उम्रकैद #NagpurNews #CentralJail #Crime #Murder...
राष्ट्र सुरक्षा के समर्थन में मौन पदयात्रा #MaharashtraNews #NationalUnity #Constitution #Youth
Abhijit Dipke का BJP पर बड़ा आरोप | #MaharashtraNews #AbhijitDipke #BJP #AmitShah...
Amravati में सड़क हादसों पर बड़ा एक्शन #AmravatiNews #RoadSafety #TrafficRules #Helmet #FakeHelmet





