Published On : Thu, Jul 11th, 2019

युवासेना कामठी तालुका चिटणीस पदी देवेश ठाकरे यांची नियुक्ती

कामठी :-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनार्थ शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रामटेक लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या.यानुसार कामठी विधानसभा च्या जाहीर युवासेना पदाधिकारी नुसार युवासेना कामठी तालुका चिटणीस पदी रणाळा रहिवासी देवेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून युवासेना कामठी तालुका युवा अधिकारी पवित्र मेश्राम, तालुका समन्वयक अमोल मोहोड, उपलतालुका युवा अधिकारी सुमित बावणे, राहुल वंजारे यांची नियुक्ती करण्यात आली.

युवासेना कामठी तालुका चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल देवेश ठाकरे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे , खासदार कृपाल तुमाणे, शिवसेना जील्हाप्रमुख इटकेलवार, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, तालुका प्रमुख वासू भोयर यांचे मनपूर्वक आभार मानत पक्ष बळकटी साठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत व्यक्त केले तसेच नवनियुक्त झालेले युवासेना पदाधिकारी तसेच तालुका चिटणीस देवेश ठाकरे यांच्यावर शिवसेना नागपूर जिल्हा शहर तसेच ग्रामीण च्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

संदीप कांबळे कामठी