Published On : Thu, Jul 11th, 2019

परभणीत राष्ट्रवादी युवकचे ‘रिक्षा ओढो’ आंदोलन

वाढत्या इंधनदरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक आक्रमक

परभणी : वाढत्या इंधनदरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज परभणीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा ओढो आंदोलन करण्यात आले.

देशात सर्वात महाग डिझेल व पेट्रोल परभणी जिल्हयामध्ये मिळत असून सध्या इथे डिझेल ७०.३८पैसे प्रतीलिटर व पेट्रोलचा दर ८०.४१ पैसे प्रतीलिटर असा आहे.

महाराष्ट्रात तसेच परभणी जिल्ह्यात विकास झाला नसून तो इंधन व महागाई वाढीत नंबर एकचा विकास झाला आहे म्हणून या उदासीन सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढतच आहे असा आरोप युवकांनी केला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना वाढत्या महागाई व इंधनदरवाढी विरोधात निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी केले.

यावेळी जिल्हा प्रभारी डॉ. संतोष मुंडे, जिल्हाध्यक्ष शांतीस्वरूप जाधव, शहराध्यक्ष किरण तळेकर, पक्षाच्या राष्ट्रीय महिला सचिव सोनालीताई देशमुख, महिला शहराध्यक्षा नंदाताई राठोड, गंगाधर जवंजाळ, अक्षय पाटील, रितेश काळे, सिद्धांत हाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.