Published On : Fri, Jul 31st, 2020

नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई येथील दिपांशी मलघाटे प्रथम

शाळेतील दहावी आणि बारावी मधे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पडला पार..

रामटेक– नवजीवण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई येथे दहावी, आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम उपसरपंच रोशन राऊत यांचा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रथम क्रमांक दीपांशी रवींद्र मलघाटे हिने 91.20 टक्के घेऊन बाजी मारली आहे तर द्वितीय क्रमांकावर संजना रणधीर गजभिये हिने .90.60 टक्के , तर तृतीय क्रमांक मानसी प्रकाश तुपट हिने 88.60 टक्के प्राप्त केले आहे. तर चतुर्थ .आल तुकाराम राऊत हिने 88.20 टक्के प्राप्त केले आहे, आचल गौतम वासनिक हिने 84.00 टक्के प्राप्त केले आहे.

तसेच बारावी च्या परीक्षेत विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक ऋषिकेश नाईक, 89.30 टक्के प्राप्त केले द्वितीय क्रमांक आदित्य बैस ह्याने 70.46 टक्के मिळवले आहे. .आणि तृतीय क्रमांक आयुशी दुबे हिने 69.86 टक्के प्राप्त केले आहे.

तर कला शाखेतून किरण धुरवे 68.61हिने टक्के प्राप्त केले , द्वितीय क्रमांक प्रतिमा सोनवणे हिने 63.00 टक्के प्राप्त केले .या सर्व दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्यद्यापिका वंदना माकडे मॅडम , पर्यवेक्षक ढपकस सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद , शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक वर्ग रवींद्र मलघाटे , सुरेश किनेकर यांनी विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन , आशीर्वाद देऊन अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे संचालन कोडवते सर तर प्रस्तावना गायकवाड सर ,आणि आभार प्रदर्शन दर्यापुरकर सर यांनी केले.