Published On : Wed, Apr 12th, 2017

दिक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस बससेवा नागरिकांची मागणी रास्तच- महापौर


नागपूर:
दिक्षाभूमी ते ड्रेगन पॅलेस बससेवा सुरु करण्याची भाजपच्या अनुसूचित मोर्च्याची व अनेक संघटनांनी मागणी केली होती, नागरिकांची ही मागणी रास्तच होती त्यामुळे तातडीने यावर निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून नागरिकांच्या सुविधेसाठी या बससेवेचे लोकार्पण केले असे विधान महापौर नंदा जिचकार यांनी केले. बुधवार ता. १२ रोजी सकाळी ११ वाजता दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर महापौरांच्या हस्ते दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस बससेवेचे लोकार्पण पार पडले.

याप्रसंगी उपमहापौर दिपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, आमदार डॉ. मिलिंद माने, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोनच्या सभापती रुपा रॉय, नगरसेवक सुनील हिरणवार, ॲड. धममपाल मेश्राम, लखन येरावार, प्रमोद तभाने, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, सहायक आयुक्त महेश मोरोणे, परिवहन प्रशासकीय अधिकारी अरुण पिपूरडे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे व्यवस्थापक व विश्वस्त डॉ. सुधीर फुलझले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी.पवार, आशिष फुलझले, जितू बनसोड, विक्रांत गजभिये, शामराव हाडके, राहूल कांबळे, संजय पाटील, सतीश शिरसवान व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या, दहा पंधरा दिवसांपूर्वीच मला अनेक संघटनेकडून निवेदन मिळाले, दीक्षाभूमीला भेट देणारे पर्यटक, उपासक, महाविद्यालयीन विद्यार्थी आदींसाठी ही मागणी अतिशय रास्त होती परिणामी या मार्गावर चालणाऱ्या दोन बस सेवेचे लोकार्पण करताना मला अतिशय आंदन होत आहे. आमचे शासन नेहमीच लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. माननीय केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ब्रिदच आहे, सत्ता ही लोकांच्या सेवेसाठीच राबवायची, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्व स्तरातील लोकांना जास्तीत जास्त कशी सेवा पुरविता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. या पुढे ही जनतेच्या सुविधेसाठीच आमचे सरकार काम करणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.

प्रारंभी महापौर, उपमहापौर व इतर मान्यवरांच्या हस्ते दोन्ही बसेसची फित कापून नारळ फोडण्यात आला. मेणबत्ती पेटवून फूले वाहण्यात आली. याप्रसंगी दीक्षाभूमीचे व्यवस्थापक व विश्ववस्तांनी महापौरांचे विशेष आभार मानले. सुत्र संचालन जन संपर्क अधिकारी अशोक कोल्हटर यांनी केले.

बसेस चे वेळापत्रक

सकाळी ७.२० पासून रात्री ९.३० पर्यंत येणे-जाणे धरुन एकूण २२ फेऱ्या एका बसची असेल तर दुसरी बस सकाळी ९.४५ ते रात्री ८.४५ दरम्यान एकूण ६ फेऱ्या मारणार. दीक्षाभूमी ते मोरभवन तिकीटाचे दर ८ रुपये असून दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंतचा तिकीट दर ३० रुपये आहे. एका बसची आसन क्षमता ३५ असून उभ्यानेही काही प्रवासी प्रवास करु शकतात. विशेष म्हणजे या दोन्ही बसच्या वाहक या महिला असून रंजना सुखदेव व सरोज पखाले वाहकांची जवाबदारी सांभाळणार आहेत.