Published On : Thu, Apr 13th, 2017

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज


नागपूर:
पंतप्रधानाच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमी आणि मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममधील मुख्य कार्यक्रमाच्या व्यवस्थेसंदर्भातील आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. १३) घेतला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, दीक्षाभूमी समितीचे सुधीर फुलझेले, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. १४) नागपुरात येत असून ते दीक्षाभूमी येथे भेट देणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे ते दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करतील. या संपूर्ण दौऱ्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांनी दीक्षाभूमीवरील व्यवस्थेची पाहणी केली.वाढलेले तापमान लक्षात घेता पंतप्रधान येणाऱ्या प्रवेशद्वार ते स्मारकापर्यंत ग्रीन नेट, तसेच जमिनीवर रेड कारपेट टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत. दीक्षाभूमी परिसरात झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्याचे तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे, उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेत.

दीक्षाभूमीनंतर महापौर नंदा जिचकार यांनी मानकापूर स्टेडियम येथील प्रस्तावित कार्यक्रमाच्या व्यवस्थेची पाहणी केली. तेथेही आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.


यावेळी दीक्षाभूमी समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, अधीक्षक अभियंता (लोककर्म) मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) दिलीप जामगडे, अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. विजय जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी यावेळी उपस्थित होते.