Published On : Mon, Jul 18th, 2022

खेड-भीमाशंकर, खुलताबाद-घृष्णेश्वर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय : ना. गडकरी

Advertisement

दिल्ली/नागपूर: राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थस्थळांचा व पर्यटन स्थळांचा विकास साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री. क्षेत्र भीमाशंकर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री. क्षेत्र घृष्णेश्वर या दोन तीर्थस्थळी पोचण्यासाठी असणार्‍या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते व दळणवळण साधनांच्या माध्यमातून देशातील आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्राची महती जगभरात पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भीमाशंकर या तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या खेड-भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार आहे. एकूण 70 किमी लांबीच्या या महामार्गामुळे राजगुरुनगर (खेड) चार, वाडा, तळेघर ही काही महत्त्वाची शहरे जोडली0 जाणार असून या महामार्गामुळे भीमाशंकरला येणार्‍या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल.

भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल. तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहाचवणे सुलभ होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल व परिसराचा शैक्षणिक व औद्योगिक विकास साधण्यास मदत होईल.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणार्‍या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. एकूण 6 किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिध्द वेरुळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. देश विदेशातील येणार्‍या भाविकांना व पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर व मंदिरापासून जवळच असलल्या एलोरा-अजिंठा लेण्यांची प्रसिध्द गुहा, या स्थळापर्यंत पोहाचवणे सुलभ होईल.

छत्रपती संभाजीनगर व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे जोडले जाणार आहेत. सदर महामार्गामुळे या परिसरातील पर्यटन, शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास हा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल.