नागपूर : दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील आणखी एका वाघाचा रविवारी नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या सहा महिन्यात वाघाचा हा महाराष्ट्रातील 18वा आणि देशातील 91वा मृत्यू आहे. वाघांच्या मृत्यूसाठी मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 25 वाघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांचा वाटा दरवर्षी देशातील जवळपास 50% वाघांच्या मृत्यूमध्ये गणला जातो.
दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रात 19 जून रोजी दक्षिण उमरेड श्रेणीतील मसाला बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक 374 मधून जखमी अवस्थेतत हा वाघ दिसला. तथापि, PCCF (वन्यजीव) कडून संध्याकाळी 5 वाजता आदेश जारी केल्यानंतर आठ तासांनंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी), सेमिनरी हिल्स, नागपूरच्या पथकाने या वाघाला पडकले.
वाघाला टीटीसीमध्ये हलवायला नको होते, असे अहवालात म्हटले आहे. या वाघाला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवायला हवे होते. जेथे वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र (WRTC) चे पशुवैद्यकीय डॉक्टर वाघावर उपचार करण्यात अधिक अनुभवी आहेत. पण गेल्या सात दिवसांपासून या प्राण्यावर टीटीसीमध्ये उपचार सुरू होते.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनसीटीए) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शवविच्छेदनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात डॉ. भरतसिंग हाडा, उपमुख्य वनसंरक्षक यांचा समावेश होता; अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक; व्ही सी गंगावणे, सहायक वनसंरक्षक (उमरेड), पीडी बाभळे आणि पी रामटेके, परिक्षेत्र वन अधिकारी, एनसीटीएचे प्रतिनिधी विनोद अरोरा; अविनाश लोंढे, मानद वन्यजीव वॉर्डन; कुंदन हाटे; डॉ स्मितारामटेके, डॉ स्वप्नील सोनोने; डॉ.विनोद समर्थ; डॉ प्रशांत सोनकुसरे, डॉ सुदर्शन काकडे, डॉ राजेश फुलसुंगे, सर्व पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते .
शवविच्छेदनात आढळून आले की वाघाच्या शरीरात पू तयार झाले असून त्याचे विषात रूपांतर झाले. त्यामुळे वाघाच्या महत्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम झाला होता.त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.