Published On : Sat, Jun 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

हुडकेश्वरमध्ये विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Advertisement

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षीय विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता डांगसे हिचा 2022 मध्ये नितीन डांगसे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला सुमारे अडीच वर्षांचा मुलगा आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नितीनला मद्यपानाचे व्यसन होते. लग्नानंतर तो वारंवार पत्नीशी वाद घालत असे तसेच तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नितीन हा एका खासगी डिलिव्हरी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले जाते.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

4 जून रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर अंकिताने राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तिला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी पती नितीन डांगसे आणि सासू पार्वताबाई डांगसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. आरोपींकडून होत असलेल्या कथित छळामुळे अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण आणि आरोपांमधील सत्यता स्पष्ट होणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.