Published On : Wed, Aug 7th, 2019

दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षांवर धारधार चाकूने दारुविक्रेत्याचा जीवघेणा हल्ला

या हल्ल्यात मंडळाच्याअध्यक्षा पूजा काळे गंभीर जख्मी

हिंगणघाट : शहरातील डांगरी वार्ड परिसरात राहणाऱ्या दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा वर दारूविक्रेत्यांकडून धारधार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री ९ च्या सुमारास घडली . याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

Advertisement

प्राप्त माहिती नुसार पूजा प्रवीण काळे वय ३० अस जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूबंदी महिला मंडळाची अध्यक्षा आहेत. सदर घटना सोमवारी रात्री9वाजता चे दरम्यान घडली. दारूबंदी महिला मंडळाची बैठक घेऊन पूजा काळे आपल्या डांगरी वार्ड येथील राहत्या घरी येत असताना तिच्या घराजवळ चार दारू विक्रेत्यांनी तिला अडविले व मारहाण सुरू केली. यातील एका दारू विक्रेत्याने पूजा कालेच्या छातिवर चाकूने वार केले. यादरम्यान आपले नातू का रडत आहे व कशाची गर्दी जमली आहे हे पाहण्यासाठी पुजाचे वडील रमेश जुमडे हे गेले असता त्यांच्या मुलीला चाकूने मारत असल्याचे त्यांना दिसले .

Advertisement

आपल्या मुलीला मारणाऱ्या दारूविक्रेत्यां चां प्रतिकार करून पोलिसांना याघटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पूजा काळे ला उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. या हल्ल्यात पूजा गंभीर जखमी असल्याने तिला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादवी 307,34, 109 अनव्ये गुन्हा नोंद केला आहे. आरोपींच्या शोधासाठी हिंगणघाट पोलीसांनी प्रयत्न करून गणेश भांगे 32, गोलू पांडे34, संदीप थुटरकर38 सर्व रा डांगरी वॉर्ड, हिंगणघाट यांना मंगळवारी ताब्यात घेतले.

गत अनेक वर्षांपासून पूजा काळे ही दारूबंदी महिला मंडळाच्या वतीने हिंगणघाट शहरात दारूबंदी साठी काम करत आहे. अनेक महिलांना एकत्रित करून पूजा काळेनी दारूबंदी महिला मंडळाची स्थापना शहरातील डांगरी वार्ड येथे केली .

मात्र पूजा काळे व तिच्या सहकारी महिला मंडळाच्या सदस्यांनी मिळून डांगरी वार्ड येथील संपूर्ण दारूबंदी केली . यात तत्कालीन पोलीस अधीक्षका निर्मला देवी यांनी देखील पूजा काळे ला मोठे पाठबळ दिले होते . मध्यंतरी हिंगणघाट शहरात अनेक ठिकाणी दारू सुरू होती मात्र मात्र डांगरी वार्ड येथील दारू विक्री बंद असल्याने चिडलेल्या दारूविक्री करणाऱ्या व्यवसाईकानी दारू बंदी महिला मंडळाच्या विरोधात पोलिसात खोट्या तक्रारी करणे सुरू केले . यातही पूजा काळे जुमानत नसल्याचे निदर्शनास आल्यांने पूजा काळे वर जीवघेणा हल्ला करण्यात आला . तत्पूर्वी ही दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांवर व पूजा काळे वर जीवघेणा हल्ला केल्या गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहे .

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement