Published On : Wed, Jul 31st, 2019

पाण्यात पाय फसला अन् रेल्वेने नेले फरफटत

Advertisement

अपघातानंतर आरपीएफ जवानाचा वाचला जीव, आरपीएफ जवान धावले मदतीला

नागपूर : रेल्वे गाडीत बसण्याच्या धावपळीत त्या जवानाचा हात निसटला अन् त्याचे पाय गाडीच्या पाण्यात फसले आणि तो उलटा झाला. तशाच स्थितीत रेल्वेने त्याला फरफटत नेले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या दोन जवानांनी आपला जीव धोक्यात घालून त्या जवानाला वाचविले. देव तारी त्याला कोणी मारी या म्हणीच प्रत्यय देणारी घटना आज मंगळवारी नरखेड रेल्वे स्थानकावर घडली. राजेश गडपलवार (२५) असे त्या जखमी जवानाचे नाव आहे. त्याच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वे गाड्यात विनापरवानगी खाद्य विक्रेत्यांचा बोलबाला आहे. त्यांची धरपकड करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. सहायक उपनिरीक्षक सीताराम जाठ यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय पथकात राजेशचा समावेश आहे. पाच सदस्यीय पथक आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास दक्षिण एक्स्प्रेसने निघाले. दरम्यान त्यांनी एका अवैध खाद्य विक्रेत्याला पकडून नरखेड आरपीएफच्या ताब्यात दिले.

परतीच्या प्रवासात पुन्हा वेंडरची धरपकड करीत नागपुरला येणार होते. १२७९२ दाणापूर एक्स्प्रेस नरखेड फलाटावर लागली होती. सर्व जवान गाडीत बसले. दरम्यान राजेश हा गाडीत चढत असताना त्यांचा हात निसटला आणि त्यांचे संतुलन बिघडून दोन्ही पाय पायºयात फसले अन् ते उलटे झाले. त्याच स्थितीत गाडीने त्यांना काही दुर अंतरावर फरफटत नेले. जवळच असलेले आरपीएफ जवान गणेश सावरगावकर आणि व्दिवेदी या दोघांनीही आपला जीव धोक्यात घालून राजेशला बाहेर ओढले.

यावेळी राजेश रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला जबर जखम होती. लगेच त्यांनी रुग्णवाहिकेने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर नागपुरातील रेल्वे रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघाताची माहिती मुख्यालायाला
राजेशची दोन वर्षांपूर्वीच नागपुरला बदली झाली. या पुर्वी तो मुंबईत होता.

नागपूर आरपीएफ मध्ये कार्यरत असून कुटुंबीयांसह नागपुरात राहतो. अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मुख्यालयाला दिली असून वरिष्ठ अधिकाºयांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीकडे वरिष्ठ आणि डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.