Advertisement
नागपूर : एकीकडे शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराच्या मध्यवर्ती सीताबर्डी परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणाल असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, मृणालने त्याच्यासोबत बंदुक आणली होती. बुधवारी सकाळी त्याचे काही साथीदारही आनंद नगर येथे जमा झाले. त्याचवेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादादरम्यान मृणालने चुकून स्वत:वर गोळी झाडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.