Advertisement
नागपूर: राज्यात उष्णेतेची लाट आली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला.
भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.
तर वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोला शहरात तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होता.
तसेच तापमानात एप्रिल आणि मे महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.