Advertisement
नागपूर : माजी महापौर आणि महानदी कोल इंडिया लिमिटेडचे स्वतंत्र संचालक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ‘मौन’ रचित अभिव्यक्त ‘मौन’चा लोकापर्ण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या पुस्तकाचे लोकापर्ण झाले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ साहित्यकार डॉ. सागर खादीवाला, प्रमुख अतिथी म्हणून गिरीश व्यास हे उपस्थित होते.
सोमवार दिनांक १७ जुलैला सांयकाळी ६ वाजता “अर्पण”, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, पहिला मजला, मोर हिंदी भवन, झाशी राणी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जयमाला तिवारी, अभिषेक तिवारी, अनिल मालोकर आणि ‘मूक’ मित्र परिवार आणि सहज महिला मंच यांनी या सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले.