नागपूर : मेडिकल रुग्णालयातील वसतिगृहात एका निवासी महिला डॉक्टरच्या आंघोळीचा व्हिडीओ काढणाऱ्या डॉक्टरची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे. डॉ. दर्शन अग्रवाल असे त्या नराधम डॉक्टरचे नाव असून त्याची विशाखा समितीकडूनही चौकशी करण्यात येत आहे.
महिला निवासी डॉक्टर ही मेडिकलमध्ये पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. ती आंघोळीला गेली असता डॉ. दर्शन याने मोबाईलच्या माध्यमातून तिचा व्हिडीओ रिकॉर्ड करण्यास सुरुवात केली. महिलेला याची भनक लागताच तिने आरडाओरडा सुरु केला. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. दर्शनला अटक केली. तर दुसरीकडे मेडिकल प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेत सहा सदस्यीय समितीची स्थापना केली. मेडिकलमधील विशाखा समितीकडूनही चौकशी सुरू झाली. यानंतर डॉ. दर्शनची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मेडिकलमधील मुलांना चांगले शिक्षण व काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून प्रशासनाने वसतिगृहात महिला व पुरुष असे दोन गृहपाल देण्यासह मुले व मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय केली असल्याचे ते म्हणाले. तसेच आरोप डॉक्टरवर कठोर कारवाई कारण्यात येईल, असेही ते म्हणाले.