Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अनिल सोले यांच्या बंडखोरीने फरक पडणार नाही,भाजप सुधाकर कोहळेंच्या पाठीशी ठाम: दयाशंकर तिवारी

Advertisement

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची भूमिका घेतल्याने भाजपमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, सोले यांच्या उमेदवारीचा पक्षाच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. भाजप पूर्ण ताकदीने सुधाकर कोहळे यांच्या पाठीशी उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनिल सोले यांनी पक्षासोबतचा संवाद संपल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी आपली भूमिका मांडली. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उघड झाली असली, तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

सोले यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही तिवारी यांनी केले. पक्षाने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केलेले नसल्याचा संदेश देत, त्यांनी सोले यांना भाजपमध्ये परतण्याचे आवाहन केले.

दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य बंडखोरीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आता अनिल सोले यांच्या अपक्ष उमेदवारीचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.