Published On : Tue, May 21st, 2019

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नासुप्र अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

नागपूर: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून आज मंगळवार (दिनांक २१ मे २०१९) रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात आला. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) श्री सुनील गुज्जेलवार यांच्याहस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्टा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सामना करू, अशी शपथ घेण्यात आली. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्‍यांनीही राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी नामप्रविप्रा’च्या नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री लांडे, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री पी.पी. धनकर, कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रकल्प) श्री प्रशांत भांडारकर, आस्थापना अधिकारी श्री योगीराज अवदूत तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement