Published On : Tue, May 21st, 2019

कन्हान ला तीन दिवसीय भव्य बुद्ध जयंती महोत्सव थाटात संपन्न

Advertisement

बुद्ध,भीम गीताच्या नटराज ऑर्केष्टाने श्रौते मंत्रमुग्ध

कन्हान: रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या विद्यमाने तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध यांची २५६३ वी जयंती कन्हान वा विविध कार्यक्रमाने तीन दिवसीय भव्य बुद्ध जयंती महोत्सव थाटात साजरी करण्यात आली.

संपुर्ण विश्वाला शांतीचा व अहिसेचा संदेश देणारे तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृति क संघ कन्हान व्दारे आंबेडकर चौक कन्हान येथे शुक्रवार (दि.१७) मे ला सायं ७. ३० वा. ” नटराज ऑर्केस्टा ” १२८ तास नॉनस्टाप वल्ड रिकार्ड बनविणारे सुरज शर्मा व रामबाबु व्दारे मनमोहक बुद्ध, भिम गित प्रस्तुत करून उपस्थित श्रौत्यांना मंत्रमुग्ध केले. शनिवार (दि.१८) ला सायं ७ वा.” कवी सम्मेलन ” सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यीक नागपुर संजय गोळघाटे, प्रसिध्द कवी सुदर्शन चक्रधर व संच व्दारे काव्य रचनातुन बुद्धाच्या शांती व अहिसेच्या मार्गक्रमण करण्याचा संदेश देण्यात आला. रविवार (दि.१९) ला सायंकाळी ६ वाजता पंचशिल नगर सत्रापुर बुद्ध विहारात वंदना करून ” भव्य धम्म रैली ” ढोल ताशा , अखाडा, शिस्तबद्ध समता सैनिक दल आणि डि जे सह काढुन कन्हान च्या मुख्य महामार्गा ने गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा रोड चौक मार्गक्रमण करित नाका नं.७ येथे महाप्रसाद वितरण करून भव्य धम्मरैली चे समापन व तीन दिवसीय भव्य बुध्द जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. या तीन दिवसीय कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर, मोतीराम रहाटे, रमेश गोळघाटे, शांताराम जळते, रोहित मानवटकर, विनायक वाघधरे, दौलत ढोके, भगवान नितनवरे, वामन पाहुणे, प्रकाश रंगारी, चेतन मेश्राम, गोपाल गोंडाणे, सुनिल सरोदे, नरेश चिमणकर, निखिल रामटेके, महेंद्र वानखेडे, मनोज गोंडाणे, रविंद्र दुपारे सह रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे कार्यक्रत्यांनी अथक परिश्रम घेतले.