Published On : Mon, Apr 22nd, 2019

दवलालामेटी परिसरात इंनफन्ट चर्च मध्ये गुड फ्रायडे दिन साजरा

प्रार्थना,व शोक रॅलीचे आयोजन

नागपुर: वाडी -अमरावती महामार्गाला लागून असणाऱ्या दवलामेटी 8 वा मैल येथे बालक येशू इनफन्ट चर्च द्वारा गुड फ्रायडे दिना निमित्य एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक १९/४ / २०१९ सकाळी १० वाजता करण्यात आले.ख्रिश्चन धर्माचे संस्थापक व विश्वात शांती ,प्रेमाचे सन्देश देणारे भगवान प्रभू येशू ला अंत्यत क्रूर पद्धतीने सुळावर चढविन्यात आले होते. जगाचे कल्याण करणारे प्रभू येशू हसत हसत सुळावर चढून शहीद झाले .विरोधी लोकांकडून एवढा अन्याय सहन करून सुद्धा त्यांना माफ करून देण्यास सांगण्यात आले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावरून प्रभू येशू किती महाण होते यांचा प्रत्यय येतो. ज्या दिवशी प्रभू येशूला सुळावर चढविले , जगाला त्यांनी प्रेम व शांतीचा संदेश दिला तो दिवस म्हणजे गुड फ्रायडे हा संपूर्ण जगात दुःख व्यक्त करून ख्रिश्चन बांधव द्वारा साजरा केल्या जातो.

बालक येशू इनफन्ट चर्च द्वारा सकाळी चर्च समोरील मैदानात विशेष प्रार्थना करण्यात आली.उपस्थित समाज बांधवांना चर्च चे फादर लाजींन मार्गदशन करुन प्रभू येशू द्वारा मृत्यू होण्यापूर्वी सांगीतलेले सात शब्दांचा अर्थ व जीवनाचे महत्व काय असतो या बदल माहीती दिली.

प्रार्थने नंतर फादर वियाणी यांच्या नेतृत्वात ख्रिश्चन समाज बांधव यांच्या उपस्थितीत पुरुष,महिला, मुले, मुली या दुखभोग रॅली राठी ले आऊट,सम्राट अशोक नगरातून भ्रमण करून चर्चमध्ये येऊन सांगता करण्यात आली.

दुःख दिवस रॅली मध्ये सिरील पेट्रो,डेंनीयल,राजू जोसेफ,सिल्व्हेस्टर सलदाना,रुबी जोसेफ,ईवलीन पेट्रो,मनीषा कुजूर,आलोक लूक,निशा सलदाना विनीत कुजूर,विनीत टोपो ,पूर्ण पेरिष,काऊन्सिल इत्यादीनी सहभाग घेतला.

Advertisement
Advertisement