Published On : Mon, Apr 22nd, 2019

पाकिस्तानच्या विरोधात श्राप देऊन देशाला भयमुक्त करावे ,वाडीत राजकीय -सामाजिक वर्तुळात आक्रोश

साध्वी प्रज्ञा सिंहने केलेल्या शहीद हेमंत करकरेंच्या अपमानास्पद वक्तव्याचा वाडीत तीव्र निषेध, माजी पोलीस अधिकारी संघटनेत तिव्र नाराजगी

नागपुर: भाजपाची लोकसभा उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहने शहीद हेमंत करकरे च्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य केल्याने शहीद जवान व भारतीय नागरिकांचा घोर अपमान केला आहे. ज्यामुळे जनमानसात भाजपा व साध्वींच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. वाडी परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांसह माजी पोलीस कर्मचारी संघटनेनेही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनने एक निषेध निवेदन प्रस्तुत करून आक्रोश प्रगट करीत सांगितले की साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर द्वारा केल्या गेलेले वक्तव्य पूर्णत: अनुचित व निषेधार्य असून २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मुंबई एटीएसचे दक्ष व जाबाज अधिकारी हेमंत करकरे आपल्या जीवाची परवा न करता दहशतवाद्यांचा सामना करता शहीद झाले, आणि पूर्ण जगाने या घटनेला प्रत्यक्ष बघितले. परंतु साध्वी म्हणणारी हि भाजपा ची नेता स्वतःचा स्वार्थासाठी माझ्या श्रापानेच हेमंत करकरेंचा मृत्यू झाला असे वक्तव्य देणे निश्चितच दुःखदायक व निषेधार्य आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश मेहता, सह सचिव नागेश घोडकी, सचिव सुरेश महले ने एक प्रेस नोट प्रस्तुत करून या वक्तव्याचा निषेध केला आहे.

# तर दुसरीकडे नागपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे, महासचिव दुर्याधन ढोणे,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराने, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस,इत्यादींनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या विचारधारेने भाजपचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. देशभक्तीचा पाठ शिकविण्याचा दावा करणारे भाजपने या साध्वी प्रज्ञासिंगला निवडणुकीच्या मैदानात उतरविले जिने असे वक्तव्य केलेले आहे.तर आरएसएस साध्वी प्रज्ञा सिंगांचा बचावही करीत आहे.धर्मावर राजनीती, फक्त स्वार्थ व संभ्रम निर्माण करणाऱया या वक्तव्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. जनतेनी आता यांच्या बहकाव्यात येऊ नये

# रिपाई नेते दिनेश बनसोड नेही तीव्र असंतोष व्यक्त करून सैनिक व शहिदांवर राजनीती होऊ नये, हे वक्तव्य जनतेच्या इच्छेचा विपरीत आहे. भाजपची नेता साध्वी प्रज्ञा सिंहने केलेले वक्तव्य अपमानास्पद व निंदनीय आहे. कारवाई झालीच पाहिजे.

# राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे नेही या अपमानजनक वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.अशा वक्तव्या पश्चात भाजपचे पदाधिकार्यांची वैचारिक पोल खुलल्याने ते आता सारवासारव करीत आहेत. हा शहिदांचा अपमान आहे. भाजप देशभक्तीचा दावा करते तर मग प्रज्ञा साध्वीला बाहेरचा रस्ता दाखवून निषेध प्रगट केला पाहिजे. प्राप्त माहितीनुसार बॉम्बस्फोटाची आरोपी प्रज्ञा साध्वीच्या विरोधात एटीएसने तपासादरम्यान कुठलीही कठोर भूमिका घेतली नव्हती, शापामुळे हत्या होणे हा एक अंध श्रद्धेचा विषय आहे. शहिदांचा अपमान, केंद्र सरकारने प्रदान केलेले स्वर्गीय करकरेंना वीर पुरस्काराचा अपमान पाहता, ही साध्वी संपूर्ण देशाला शांती व सुव्यवस्थेसाठी धोका

दायक असल्याचे सिद्ध होते. असे विचार आणि वक्तव्याने तिला पुन्हा कारागृहात पाठविले पाहिजे.

# बसपाचे शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के नेही निषेध व्यक्त करीत सांगितले की वाईटात वाईट विचारही आपल्या शहिदांचा असा अपमान करू शकत नाही, पण आता “मोदी है तो मुमकीन है” या चमत्कारी साध्वीने आता अंडरवर्ल्डचे लोक व पाकिस्तानच्या विरोधात श्राप देऊन देशाला भयमुक्त करावे. बहुजनांना धर्माच्या नाववर उल्लू बनविणे आता बंद झाले पाहिजे व साध्वीवर देशद्रोहाची कार्यवाही झाली पाहिजे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे च्या नुसार हे वक्तव्य अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. देशांतर्गत राजकारणात अशाप्रकारे शहीद झालेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून साध्वी प्रज्ञा सिंहाचे खरे देशप्रेम समोर आले आहे. मनसे या वक्तव्याचा तीव्र निषेध करते.