Published On : Sat, Aug 26th, 2017

…तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी

kirti-azad
नवी दिल्ली:
‘… तर लंकेला लागलेल्या आगीसारखी सरकारी कार्यालये जाळेन, तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन’, हे उग्दार आहेत स्वत:ला शिस्तप्रिय म्हणवून घेणाऱ्या आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निलंबीत खासदाराचे. किर्ती आझाद असे या निलंबीत खासदाराचे नाव असून, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

बिहारमध्ये आलेल्या महापूरानंतर आझाद यांनी पीडितांची दरभंगा येथे भेट घेतली. या भेटीवेळी आझाद यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी पीडितांना मदत करताना दिरंगाई केली अशी नाराजी व्यक्त केली. मात्र, ही नाराजी व्यक्त करताना आझाद यांची जीभ भलतीच घसरली. आझाद म्हणाले, पीडितांना मदत करण्यात जर दिरंगाई केली तर, लंकेप्रमाणे सरकारी कार्यालयांना आग लावून खाक करू, तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नग्न धिड काढू. आजाद यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आझाद यांच्या जीभेची घसरण इथेच थांबली नाही. त्यांनी दरभंगाच्या एसडीओ मोहम्मद रफीक यांना इशारा देत सांगितले की, इथल्या अधिकाऱ्यांनी जर कामात दिरंगाई केली तर, त्यांचे मूंडन केले जाईल. तसेच, त्यांना गाढवावर बसवून त्यांची नग्न धिंड काढली जाईल, अशी धमकीही आजाद यांनी दिली