Published On : Thu, May 10th, 2018

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Damu Shingda

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरटिणीस पृथ्वीराज साठे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.