Published On : Thu, May 10th, 2018

BSNL चा प्लॅन : 39 रुपयात अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, आणि इतर…

Advertisement

मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने ग्राहकांसाठी नवीन आणि स्वस्त प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि फ्री PRBT १० दिवसांसाठी देण्यात येत आहे. बीएसएनएलची ही ऑफर होम सर्किल आणि नॅशनल रोमिंग दोघांसाठी उपलब्ध आहे. मात्र अजूनही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिल्ली आणि मुंबईत सुरु झालेली नाही.

९९ आणि ३१९ रुपयांचा प्लॅन
३९ रुपयांच्या प्लॅनशिवाय बीएसएनएलने अलिकडेच ९९ आणि ३१९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये संपूर्ण देशातील कोणत्याही नेटवर्कवर २६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ९० दिवसांसाठी मिळत आहे. मात्र यात एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जियोमध्ये ४९ रुपयांत मिळेल सर्व काही
रिलायन्स जिओने युजर्ससाठी फ्री व्हाईस कॉलिंगची सुविधा सुरु केली आहे. यात 1 GB 4G डेटाची सुविधा ४९ रुपयांत मिळत आहे. ४९ रुपयांत युजर्स १ महिन्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर फक्त जिओ फोन युजर्ससाठी व्हॅलिड आहे. बीएसएनएलचा ३९ रुपयांचा प्लॅन सर्व प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे.

Advertisement
Advertisement