Published On : Mon, Mar 16th, 2020

सदानंद फुलझेले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी : महापौर

Advertisement

नागपूर : आंबेडकरी चळवळीतले समर्पित कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निकटवर्तीयांपैकी एक नागपूर महानगर पालिकेचे माजी उपमहापौर सदानंदजी फुलझेले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

ते म्हणाले, बुद्धवासी सदानंद फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन समोर ठेवून दीक्षाभूमी उभारणीत आपले योगदान दिले. दीक्षाभूमीच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. दीक्षाभूमीसाठी त्यांनी केलेले कार्य सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. सदानंद फुलझेले यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध होते. माझ्यासाठी ते पितृतुल्य होते. यामुळे माझीही वैयक्तिक हानी झाली, असेही ते म्हणाले.

महापौर संदीप जोशी यांनी सदानंद फुलझेले यांच्या धरमपेठ स्थित निवासस्थानी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.